प्रीती
प्रीती मिळेल का हो
बाजारी
प्रीती मिळेल का हो शेजारी
प्रीती मिळेल का हो बागात
प्रीती मिळेल का हो शेतात
प्रीतीची असे अशी ग मात
पहा
शोधुनी हृदयात !
नंदनवनामधी आला
कल्पलतेला बहर भला
तिची ह्रदयी वीजे पङली
प्रीती त्यातूनि
अवतरली !
प्रीतीची अशी असे ग मात
पहा आपुल्या हृदयात !
प्रेमळ कृत्यांची माळ
प्रियजनकंठी घाल;
द्विगुणित मग तो
प्रीती तुला
देईल, न धरी शंकेला
प्रीतीचा
असा असे ग सौदा
प्रीतीने
प्रीती संपादा !
ह्रदयी आलिंगन पाहीले
चुंबन मुखकमली वहीले
आणिक रुचतील ते चार
प्रीतीला होती उपचार
प्रीती
वाढली, गङे ग सतत
पहा
तु प्रियजनहृदयात
प्रीती असेल का ग बाजारी ?
वेडे ! प्रीती मिळेल का शेजारी !
_ केशवसुत
No comments:
Post a Comment