प्रीती हवी तर
प्रीती हवी तर जीव आधी कर अपुला कुर्बान;
प्रीत हवी तर तळहातावर घे कापुनी मान !
तलवारीची धार नागिणी लसलसती प्रीत,
याद ठेव अंगार लावील जगाला निमिषात !
प्रीती निर्मिली तुला वाटते का दुबळ्यासाठी ?
प्रीतीदेवी जगदेकरवी जो जाय तयापाठी
नव्हे प्रीतीला रंग लाविला लाल गुलाबांचा,
परी रुधिराचा, धडधडणाऱ्या जळत्या जीवाचा.
गुल गुल बोले प्रती काय ती ? काय महालात ?
प्रीती बोलते काळ घालिता कलिजाला हात !
स्त्रैणपणाच्या चार भावना नाच पचती ज्याला
हीन जीवाने घेऊ नये त्या हा जहरी प्याला !
सहय जीवाला होय जाहला जरी विधुत्पात,
परी प्रीतीचा घात भयंकर दुसरा कल्पांत !
जिवंतपणी मरण घेउनि फिरणे जगतात,
साठविली ब्रम्हांड दाहिनी दाहकता यात
!
_ बालकवी
No comments:
Post a Comment